November 26, 2022

वाळू माफियांपासून संरक्षणाची तहसीलदार यांची मागणी !

वाळू माफियांपासून संरक्षणाची तहसीलदार यांची मागणी !

गेवराई – दोन तीन दिवसापासून गोदावरी पात्रातील वाळू माफियांवर महसूल विभागाकडून कारवाई सुरू आहे.त्यामुळे या वाळू माफियांनी तहसीलदार यांना शिवीगाळ करत धमकवल्याने पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.वाळू माफियांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे तहसीलदार यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी खाडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.

गेवराई तहसील कार्यालयामार्फत गेल्या दोन तीन दिवसापासून वाळू माफियांवर कारवाई केली जात आहे.17 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नायब तहसीलदार जाधवर यांच्या पथकाने चिंतेश्वर मंदिर परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर करावाई केली.त्यानंतर मंडळ अधिकारी कुरुलकर यांनी कोल्हेर रोड परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या वर कारवाई केली.यावेळी तहसीलदार खाडे हे खामगाव,सावरगाव आणि राक्षसभुवन या परिसरात कारवाई करत होते .

त्यानंतर खाडे हे आपल्या घरी गेले,तेथून ते कार्यालयात आले तेव्हा काही लोक त्यांच्या कार्यालयासमोर त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते.तसेच घरापासून कार्यालयापर्यंत काळ्या गाडीतून त्यांचा पाठलाग करत तहसील च्या गेटवर त्यांना अडवून शिवीगाळ केली गेली.

याबाबत पोलिसात तक्रार देखील देण्यात आली.ही कारवाई केल्यामुळे या वाळू माफियांच्या घराच्या लोकांनी शनिवारी तहसीलदार खाडे यांच्याविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर खाडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.शासकीय काम करत असताना आपल्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करून आपल्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी खुद्द तहसीलदार यांनीच केल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click