December 10, 2022

रेमडिसिव्हीर घोटाळा चौकशीसाठी उद्या आरोग्य सहसंचालक येणार !

रेमडिसिव्हीर घोटाळा चौकशीसाठी उद्या आरोग्य सहसंचालक येणार !

बीड- जिल्हा रुग्णालयात तत्कालीन सीएस डॉ गित्ते,एसीएस डॉ राठोड,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे आणि जायभाये यांनी केलेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शन घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे.यासाठी लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ दुधाळ हे उद्या बीडला येणार आहेत.त्यामुळे हा घोटाळा करणाऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाल्याने तब्बल 64 हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा वापर केला गेला.मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ सुखदेव राठोड,स्टोर किपर अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,राजरतन जायभाये यांनी यामध्ये काळाबाजार केल्याच्या तक्रारी झाल्या.

याबाबत दीपक थोरात आणि गणेश ढवळे यांनी तक्रार केली होती.त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी चौकशी सुरू केली होती. मात्र त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य झाले नाही.याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल आरोग्य उपसंचालक कार्यालय लातूर ने घेतली आहे.

लातूरचे सहायक संचालक डॉ के एच दुधाळ यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र पाठवून याबाबत 17 फेब्रुवारी 2022 रोजी चौकशी ला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे आता हा घोटाळा करणाऱ्या गित्ते,राठोड,बांगर,मुंडे,जायभाये, रियाज यांचे काळे कारनामे उघड होणार आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click