बीड – गेल्या वर्ष दीड वर्षात एकदाही नेत्रशस्त्रक्रिया विभागात जाऊन एकही ऑपरेशन न करणारे डॉक्टर मंडळींना सीएस डॉ सुरेश साबळे यांनी दणका दिला आहे.एसीएस डॉ सुखदेव राठोड, डॉ आळणे आणि डॉ गालफाडे यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.डॉ साबळे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालय म्हणजे आपली सासुरवाडी असल्याप्रमाणे काही डॉक्टर नेहमीच वागताना दिसतात.कधीही येतात कधीही जातात,कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी परिस्थिती आहे.ज्या एसीएस डॉ सुखदेव राठोड यांच्यावर प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी आहे ते दुपारी साडेबारा ला गायब होतात अन साडेचार ला उगवतात.
एवढच नाही तर गेल्या वर्ष दीड वर्षात डॉ राठोड,डॉ आळणे आणि डॉ गालफाडे हे तिघेही नेत्रशल्य चिकित्सक असताना त्यांनी एकही नेत्र शस्त्रक्रिया केलेली नाही.लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ माले यांच्या पाहणीत सुधाही गोष्ट समोर आली.त्यामुळे त्यांच्या आदेशावरून सीएस डॉ सुरेश साबळे यांनी या तीन्ही डॉक्टरांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ साबळे यांनी सीएस पदाचा चार्ज घेतल्यापासून स्वतः माजलगाव येथून सकाळी नऊ वाजता येऊन शस्त्रक्रिया करण्याला प्राधान्य देतात,मात्र एसीएस डॉ सुखदेव राठोड हे केवळ पाट्या टाकण्यात अन बोगस बिल काढण्यात,टक्केवारी गोळा करण्यात मश्गुल असल्याचे दिसून आले आहे.डॉ साबळे यांच्या कारवाईमुळे कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.