बीड – बीडच्या जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक, एसीएस आणि बांगर,मुंडे,जायभाये ,ठाकर आणि रियाज यांनी केलेल्या घोटाळ्याचा आवाज आता विधिमंडळात गाजणार आहे.विधानपरिषद आ विनायक मेटे यांनी या प्रकरणात लक्षवेधी सूचना दाखल केल्याने आता या भ्रष्ट लोकांवर सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोविड च्या काळात तत्कालीन सीएस,एसीएस सुखदेव राठोड,स्टोर किपर अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये, विद्यमान स्टोर किपर तानाजी ठाकर,शेख रियाज या सर्वांनी मिळून कोट्यवधी रुपयांची खरेदी केली.
या दोन वर्षांच्या काळात गणेश बांगर याच्या स्वतःच्या मालकीच्या आदित्य एंटरप्राइज आणि रियाज याच्या जवळील नातेवाईकाच्या सहारा एंटरप्राइज या दोन फर्म ला नियम धाब्यावर बसवून तब्बल 110 कोटींपेक्षा अधिक रकमेचे पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले.
हा सगळा व्यवहार संशयास्पद असल्याच्या बातम्या छापून आल्या.मात्र प्रशासनाने या सगळ्या भ्रष्ट लोकांना पाठीशी घातले.या प्रकरणी विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना दाखल केली आहे.जिल्हा रुग्णालयात झालेल्या घोटाळ्यात सीएस दोशी आहेत का,असल्यास काय कारवाई केली गेली असे त्यांनी म्हटले आहे.
आ मेटे यांनी हा प्रश्न विधिमंडळा पर्यंत नेल्यानंतर आतातरी सरकार किंवा जिल्हा रुग्णालय प्रशासन अथवा जिल्हाधिकारी हे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.