December 10, 2022

गुजरात मध्ये तस्करीसाठी निघालेला तांदूळ जप्त !

गुजरात मध्ये तस्करीसाठी निघालेला तांदूळ जप्त !

बीड – काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 27 हजार किलो तांदूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला.सात लाखाच्या तांदळासह तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

माजलगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील युसूफ इसाक आतार हा व्यक्ती रेशनच्या अन्नधान्याचा काळाबाजार करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यानंतर त्यांनी माजलगाव ठाण्याच्या पोलिसांसोबत या ठिकाणी छापा घातला .त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये पन्नास किलोचे तांदळाचे तब्बल 558 कट्टे हे आढळून आले.

हे तांदळाचे कट्टे गुजरात येथे विक्रीसाठी ट्रक मध्ये भरण्याचे काम सुरू होते.यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता युसूफ याला समाधानकारक उत्तर देता आले नाही.संशय वाढल्याने पोलिसानी त्याचा माल तपासणी केला असता हा सगळा रेशनचा तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिसांनी 6 लाख 98 हजार रुपयांचा तांदूळ,25 लाख रुपयांचा ट्रक असा 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click