बीड – शहर वासीयांच्या विविध प्रश्नांवर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी नगर पालिकेचे प्रशासक उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासोबत बैठक घेतली.शहर वासीयांना तीन दिवसाला पाणी पुरवठा करणे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे या सह विविध विकास कामांचा आढावा घेतला .
बीड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी न.प, बीड ने प्रस्ताव तयार करून पालकमंत्री मा. ना. धनंजयजी मुंडे साहेब व मा. जिल्हाधिकारी महोयदय यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
बीड शहरातील नागरिकांना नियमितरित्या तीन दिवसाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले.बीड शहरातील पेठ बीड भागात बांधण्यात आलेली मच्छी मार्केट इमारत व जुनी भाजी मंडई येथील मटन मार्केट तसेच फ्रुट मार्केट वापरण्यासाठी खुली करण्यासाठी संबधीत विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.
बीड शहरातील पार्किंग व्यवस्था करणेसाठी प्रस्तावित जागा पशु वैद्यकीय दवाखाना, सुभाष रोड येथे ३७ ए प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजीत करण्याचे सुचीत केले.बीड शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटार योजने अंतर्गत एसटीपी प्लांटच्या जागेबाबत वाटाघाटी करत तात्काळ जागा उपलब्ध करून हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले.बीड शहरात पेठ बीड आणि बुंदेलपुरा भागातील दोन्ही ठिकाणी भाजीमंडईत मुलभूत सुविधा व सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पुढील मंजूरी घेण्याच्या नगर परिषद प्रशासनाला सुचना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात 19 फेब्रुवारी पुर्वी लाईट व्यवस्था करणे, हायड्रालीक शिडी सुरू करणे व इतर व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या.घरकुल बाबतीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. लाभार्थांचे प्रथम, द्वितीय व तृतीय हप्ते वितरीत करणे. प्रलंबीत प्रस्ताव, निकष पात्र यादी पुढील कार्यवाही साठी प्रस्तावीत करणे बाबत सुचना दिल्या.
आज रोजी चालू असलेल्या रस्ते, नाली व इतर बाबींच्या बाबतीत चर्चा झाली. बलभीम चौक ते जुना बाजार मास्टर प्लॅनची सुरूवात करण्यासाठी कार्यवाही करण्याची सुचना दिली.
राष्ट्रवादी भवन ते लेंडी रोड वरील ज्या 14 कुटूंबांची जागा त्या रस्ता कामात गेली आहे, त्यांना घर बांधन्यासाठी नगर परिषदेने नविन जागा देण्याच्या प्रशासनाला सुचना दिल्या.बीड शहरात कोरोना काळात व्यापार्यांना नगर परिषदेने जो कर लावला आहे तो कर शासन नियमा प्रमाणे भरावाच लागेल परंतु, त्यावरील व्याज माफ करण्यात यावे यासाठी शासन स्तरावर निर्णय होण्याकरिता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या.