बीड – शहजाणपूर चकला येथे घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले असून माजीमंत्री पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.वाळू माफियांवर कारवाई करताना त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्याची मागणी मुंडे आणि क्षीरसागर यांनी केली आहे.
गेवराई तालुक्यात शहाजहानपुर चकला येथील सिंदफना नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या वाळू उपशामुळे खड्ड्यात पडून गेवराई तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बीड जिल्ह्यातील गोदावरी नदि व सिंदफणा नदि पात्रातील अनेक वर्षांपासुन अवैध वाळु उपसा सुरु आहे. या बाबत जिल्हाधिकारी बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना वारंवार निवेदन देऊन अवैध वाळू उपसा थांबविण्यात यावा. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वांरवार सुचना देण्यात आलेल्या होत्या ,यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असुन शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. नदिकाठच्या नागरिकांच्या जिविताला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला असुन गोदावरी व सिंदफणा नदिपात्राच्या शेजारिल गावांचे रस्ते हि मोठ्या प्रमाणात वाळु वाहतुकीमुळे खराब झालेले आहेत. शासनाच्या धोरणानुसार कायदेशिर ठेका देऊन लिलाव पध्दतीने वाळु उपशाचे कत्रांट देणे गरजेचे असते.
पंरतु अनेक ठिकाणी वाळु पट्टे लिलाव होत नसुन या मुळे अवैध वाळु उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पर्यावरणाचे तसेच रस्त्यांचे व जिवितांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी कृपया या बाबत महसुल विभाग व पोलिस विभागाला तातडिने सुचना देऊन कार्यवाही करण्यात यावी व अवैध वाळु उपसा तातडिने बंद करण्यात यावा व जे अधिकारी अवैध वाळु उपसा करण्यासाठी वाळु माफियांना मदत करतात त्यांच्यावर तातडिने कार्यवाही करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करुन मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे