December 10, 2022

संदिप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने बीडच्या विकासाला गती -अजित पवार !!

संदिप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने बीडच्या विकासाला गती -अजित पवार !!

बीड – बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची विकास कामासाठी असलेली धडपड कौतुकास्पद आहे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज बीड मतदारसंघात होत असलेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी मी या दोघांचे मनातून कौतुक करतो असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे बीडच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगत यापुढेही रस्ते वीज आणि पाण्याचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी आपण खंबीर पणे उभे असल्याचे सांगितले

बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आयोजित शंभर कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे कामगार मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाला या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते

बीड जिल्हा रुग्णालयाच्या दोनशे खाटांच्या नवीन इमारत बांधकाम शासकीय विश्राम ग्रहाचे नवीन बांधकाम तालुका क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉल चे बांधकाम आणि जवळपास मतदार संघातील 25 ते 30 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संदीप शिरसागर यांची आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी असलेली धडपड कौतुकास्पद असल्याचे सांगितले मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे तुम्ही विकास कामांचे प्रस्ताव घेऊन या त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही ऊसतोड कामगारांचे महामंडळ असो की महावितरणचा थकलेला निधी बीड शहराची पाणीपुरवठा योजना यासह रस्ते वीज पाणी यासाठी निधी दिला जाईल असा शब्द यावेळी पवार यांनी दिला

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे बीड जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्यामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची आपल्याला मोलाची साथ आहे असे मत यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले

बीड जिल्ह्यात आणि विशेषतः बीड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असून गेल्या पंचवीस वर्षापासून बीड मतदारसंघात निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर स्वतः अजित दादा यांच्या उपस्थितीत आणखी ही विकास कामे केली जातील आणि स्वतः दादा बीडला येणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे धनंजय मुंडे अजित पवार राजेश टोपे यांच्या माध्यमातून बीड मतदारसंघातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click