बीड- नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी भाजपकडून आष्टीमध्ये पल्लवी धोंडे,पाटोद्यात सय्यद खतीजाबी आणि शिरूर मध्ये प्रतिभा गाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.आ सुरेश धस यांनी या तिन्ही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे.नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असताना धस यांनी प्रस्थापितांना पसंती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगर पंचायत च्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या.बीड जिल्ह्यात आष्टी,पाटोदा आणि शिरूर मध्ये भाजपने बाजी मारली तर वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली होती.केजमध्ये जनविकास आघाडीसोबत काँग्रेस ने युती केल्याने तेथे त्यांचा नगराध्यक्ष होणार आहे.
आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी रंगनाथ धोंडे यांची सुन सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.तर पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद अबुशेठ यांची भावजाई सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड फायनल झाली आहे.तसेच शिरूरकासार नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून सौ.प्रतिभाताई रोहिदास गाडेकर यांनी अर्ज दाखल केला आहे तर राष्ट्रवादी कडून शेख शयाना नसीर यांनी अर्ज दाखल केला आहे.
14 फेब्रुवारी रोजी या बाबत अधिकृत घोषणा होणार आहे .