बीड – शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले असताना पोलीस मात्र तोडीपाणी आणि कलेक्शन करण्यात गुंग असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवी सानप यांना राग आला.कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही या बातम्या केल्याचं ते म्हणाले मात्र आम्ही स्वतःचा सोर्स कन्फर्म असल्याशिवाय बातमी करत नाहीत हे कदाचित सानप यांना माहीत नसावे.त्यामुळेच खर बोललं की सख्या आईला राग येतो तस सानप यांचं झालं.
बीड शहरात मटका,गुटखा,पत्याचे क्लब,चकरी नावाचा जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.हजारो लोकांचे संसार यामुळे देशोधडीला लागले आहेत.मात्र ज्यांच्यावर कायदा अन सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस या सगळ्या गोष्टींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
बीड शहरात भरवस्तीत सुरु असलेले अवैध धंदे हे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.पोलोस निरीक्षक रवी सानप यांनी पदभार घेतल्यापासून कोणत्या मटक्याच्या,पत्याच्या क्लबवर धाड घातली हे कधी पहावयास मिळले नाही.या सगळ्या प्रकाराबाबत न्यूज अँड व्युज ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सानप अन कलेक्शन करणारा परजने यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.
बीड शहर पोलीस कशा पद्धतीने काम करतात,तोडीपाणी कोण करत,कलेक्शन कोण करत,किती हप्ते घेतले जातात हे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक या सगळ्यांना माहीत आहे.मात्र ते कोणतीच एक्शन का घेत नाहीत हे न उलडणारे कोडे आहे.
हे सगळं खोटं असल्याची चर्चा त्यांनी सुरू केली.अन आम्ही कोणाच्या तरी संगण्यावरून ही बातमी केल्याची बडबड केली.मात्र त्यांनी पदभार घेतल्यापासून कोणत्या अवैध धंद्यावर कारवाई केली हे सांगावे.उलटपक्षी ते काही अवैध धंदे वाल्याकडून मागचा पुढचा हिशोब घेत आहेत.
बीड शहर पोलिसांना थोडी जरी वर्दीची लाज असेल तर त्यांनी अवैध धंदे करणारांचे कंबरडे मोडण्यासाठी खुर्ची सोडून फिल्डवर उतरावे.पण पैशाची झापड डोळ्यावर असलेल्या या लोकांकडून ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.त्यामुळे कोणाला राग येवो की लोभ येवो आम्ही आमचं बातमीदारीच काम करत राहणार हे निश्चित. अन सानप यांनी आमच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावे अन दोन नंबर वाल्यांच्या मुसक्या बांधाव्यात .