February 8, 2023

शंभर कोटींच्या कामाचा सोमवारी दादा करणार शुभारंभ !

शंभर कोटींच्या कामाचा सोमवारी दादा करणार शुभारंभ !

बीड (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद इमारत,पंचायत समिती इमारत तसेच जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसह तब्बल शंभर कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या सोमवारी होणार आहे अशी माहिती बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी दिली .पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड मतदारसंघात विकासाचा वेग वाढला असल्याचे आ क्षीरसागर यांनी सांगितले.

बीड विधानसभा क्षेत्रात आ.संदिप क्षीरसागर यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजुर करून घेतली. तर अनेक विकास कामांना निधी खेचून आणला. या कामांमुळे बीड मतदार संघाच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या शंभर कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण सोमवारी ऑनलाईन पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होणार आहे.

या विकास कामांमध्ये जिल्हा रूग्णालय,बीड येथील वाढीव 200 खाटांच्या इमारतीचे बांधकाम करणे. ता.जि.बीड 58.21 कोटी, बीड येथे तालुका क्रीडा संकुलच्या जागेवर बॅडमिंटन हॉल-जिम हॉल व कार्यालय इमारत बांधकाम करणे 1 कोटी, बीड येथे नवीन व्हिव्हिआयपी विश्रामगृह बांधणे व अस्तित्वातील विश्रामगृहाचे नुतणीकरण करणे 7.23 कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड या संस्थेची प्रशासकीय इमारत व कार्यशाळा बांधकाम करणे 8 कोटी, साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला-रस्ता प्रजिमा 28 कि.मी.12/0 ते 34/00 मध्ये सुधारणा करणे ता.बीड (प्रत्यक्षात कि.मी.27/0 ते 32/0) 3.88 कोटी, राममा 222 ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला ते प्रजिमा 28 रस्त्यावर कि.मी.19/00 मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता.बीड 3.50 कोटी, राममा 222 ते जोडवाडी-धारवंटा-साक्षाळपिंप्री-पारगाव शिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला ते प्रजिमा 28 रस्त्यावर कि.मी.17/500 मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता.बीड 1 कोटी, रामा 63 ते बेलुरा-नारायणगड रस्ता प्रजिमा 30 कि.मी. 3/100 मध्ये पुलाचे बांधकाम करणे ता.बीड 0.60 कोटी, बीड तालुक्यातील उरसे द्रुतगती वडगाव-चाकण-शिक्रापुर-जामखेड-बीड-म्हाळसजवळा-लऊळ-पात्रुड रस्ता कि.मी.242/200 ते 244/200 मध्ये लहान पुल बांधकाम करणे ता.बीड 2 कोटी, बीड रा.म.मा. 211 पालवण-नागझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव रस्ता (प्रजिमा 31) कि.मी.3/00 व 17/300 मध्ये लहान मुलाचे बांधकाम करणे. ता.बीड 2 कोटी, रा.मा.63 ते बेलुरा-नारायणगड रस्त्यावर कि.मी.4/300 मध्ये पुलाचे बांधकाम करणे. ता.बीड 1.50 कोटी, साक्षाळपिंप्री-पारगाव सिरस-खापरपांगरी-बीड-एमआयडीसी-कुर्ला रस्ता कि.मी.15/500 ते 27/500 व 29/00 ते 31/800 या लांबीत सुधारणा करणे ता.बीड (प्रजिमा 28 रस्ता) 3 कोटी, बीड तालुक्यातील करचुंडी ते पाटोदा प्रजिमा 33 रस्त्यावर कि.मी.0/0 ते 6/00 (प्रत्यक्षात 0/0 ते 4/100) मध्ये सुधारणा करणे. ता.बीड 2.90 कोटी, बीड राममा ते पालवण-नगझरी-बेंडसुर-भायाळा-वैद्यकिन्ही-वैजाळा-पाचेगाव-पाचंग्री रस्ता प्रजिमा 31 कि.मी.16/0 ते 20/00 मध्ये सुधारणा करणे. ता.बीड 1.30 कोटी, बीड पंचायत समिती, जि.प.बीड नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करणे 4.48 कोटी या कामांचा समावेश आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click