बीड – एकीकडे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे अवैध धंद्यावर हातोडा चालवत आहेत तर दुसरीकडे बीड शहर पोलीस मात्र तोडीपाणी अन कलेक्शन मध्ये गुंग आहेत.बीड शहरात पत्याचे क्लब,मटका,चकरी जोरात सुरू असताना कलेक्शन देखील बिनबोभाटपणे सुरू आहे.त्यामुळेच सानपांची चकरी भारी,कलेक्शन ला परजने एक नंबरी अशी चर्चा शहरात जोरात सुरू आहे.याकडे एसपी आर रामस्वामी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बीड शहर पोलीस ठाण्या अंतर्गत नेमकं काय चालले आहे याचा अभ्यास वरिष्ठांनी करण्याची गरज आहे.शहरातील बहुतांश पान टपऱ्या वर मटक्याच्या चिठ्या बिनधास्तपणे भेटतात.एवढंच नाही तर गुटखा किंग आबा मुळे हा अटकेत असताना देखील सर्रास गुटख्याची विक्री सुरू आहे.
शहरातील बहुतांश भागात मटक्याच्या बुकींनी धुमाकूळ घातला आहे.राजकीय कार्यकर्त्यांचे पत्याचे क्लब देखील बिनधास्त सुरू आहेत.मात्र हे शहर पोलिसांच्या डोळ्यांना दिसत नाही हे विशेष.शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप हे नेमकं काय करतात असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
बीड शहरात चकरी नावाचा जुगार देखील जोरात सुरू आहे.पत्याच्या क्लब वाल्याकडून 30 ते 35 हजार रुपये,मटका चालकाकडून 15 ते 20 हजार रुपये,चकरी वाल्याकडून 20 ते 25 हजार रुपये,गुटखा माफियाकडून 40 ते 50 हजार रुपये कलेक्शन केले जाते.यासाठी परजने नामक व्यक्तीवर जबाबदारी देण्यात आलेली आहे अशी चर्चा आहे.
विशेष बाब म्हणजे जे लोक हप्ते देणार नाहीत त्यांच्यावर छापे घालण्याचे नाटक केले जाते असेही दिसून येत नाही.एवढंच नाहीतर बीडमध्ये हवाला मार्फत देखील व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.मात्र डोळ्यावर पैशाची पट्टी बांधून बसलेले बीड शहर चे पोलीस या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे पंकज कुमावत हे जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यावर धाडी घालत असताना बीड शहर पोलीस मात्र सगळं काही अलबेल असल्याचे दाखवून कलेक्शन करण्यात गुंग आहेत.स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके हे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी फिल्डवर उतरत आहेत,मात्र सानप आणि त्यांची टीम मात्र काय करते हा न उलगडणारा प्रश्न आहे.
पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी शहर पोलिसांच्या या कलेक्शन नेक्सस चा धंदा बंद करण्याची अन कलेक्शन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कलेक्शनला परजने एक नंबरी !!