अंबाजोगाई – शहरातील एका बागेत असलेल्या विहिरीत बुडून दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.निदा आणि सानिया अल्ताफ शेख या दोघी बहिणींच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई शहरातील अल्ताफ शेख यांनी आलेल्या दोन्ही मुलींना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी तिच्या घरी सोडले होते.तेथून परत येत असताना स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाजवळ असलेल्या बागेत या दोघी गेल्या.
काही वेळाने या दोघींचे मृतदेह बागेतील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.दोन संख्या बहिणीच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.