September 30, 2022

जिल्ह्यातील 1865 निगेटिव्ह !

जिल्ह्यातील 1865 निगेटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2014 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 149 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1865 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 20 आष्टी 25 बीड 34 धारूर 8 गेवराई 9 केज 7 माजलगाव 16 परळी 10 पाटोदा 11 शिरूर 5 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 285 रुग्णांना डिस्चार्ज

काल बीड जिल्ह्यात 285 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 7590 झाली असून 2854 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 6.10 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 96.40% टक्के असून 1 लाख 3713 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,रुग्ण बरे होण्याचे वाढले आहे

महाराष्ट्रात बुधवारी नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट डिस्चार्ज देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 18,067 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 36,281 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 77 लाख 53 हजार 548 एवढी झाली आहे. त्यापैकी 74 लाख 33 हजार 633 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 95.87 टक्के एवढा आहे.

कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक करोना व्हायरस साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण आढळले असून 1 हजार 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या तुलनेत आज करोनाचे 6.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 लाख 33 हजार 921 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 98 हजार 983 झाली आहे. आकडेवारीनुसार, 2 लाख 81 हजार 109 लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 97 लाख 70 हजार 414 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click