बीड – जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत या उदात्त हेतूने उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयात कोणाचाच धाक नसल्याचे चित्र आहे.ब्रदर ला मारहाण असो की दारुड्यानी केलेला धिंगाणा असेल,प्रत्येकवेळी कागदी कारवाई केली जाते.मात्र प्रभारी सीएस असलेले डॉ सुरेश साबळे नेमके करतात काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक गोष्ट एसीएस राठोड वर ढकलून साबळे नेमकं काय कमावत आहेत अशी चर्चा होऊ लागली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.बुधवारी दुपारी एका दारुड्याने जिल्हा रुग्णालयात धिंगाणा घातला.दारूच्या नशेत या व्यक्तीने रुग्णलाय परिसरात असलेल्या तीन रुग्णवाहिका फोडल्या.हा सगळा प्रकार घडला तेव्हा तेथे चौकीतील पोलीस देखील हजर नव्हते .
जिल्हा रुग्णालयात हे प्रकार नेहमीचे झाले आहेत.कधी ब्रदर ला मारहाण होते तर कधी डॉक्टर ला शिवीगाळ केली जाते.मात्र या सगळ्या प्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे हे ठोस उपाययोजना करत असल्याचे दिसत नाही.
कोणत्याही गोष्टीबाबत एसीएस डॉ सुखदेव राठोड यांच्याकडे चौकशी केली जाईल अन दोषींवर कारवाई केली जाईल अस छापील उत्तर साबळे देतात अन वेळ मारून नेतात.प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयात शिस्त लावण्याचे काम त्यांच्याकडून झाल्याचे दिसत नाहीये.रुग्णालयात नेहमीच घडणाऱ्या या मारहाणीच्या घटना पाहता या ठिकाणी असलेले खाजगी सुरक्षा रक्षक नावालाच आहेत का,त्यांच्यावर फुकट खर्च केला जातो का याबाबत सुद्धा सीएस यांनी लक्ष देण्याची गरज आहे .