बीड -बीड शहरातील व्यापारी तसेच बांधकाम साहित्य मिळण्याच्या क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिष्ठाण गौरी हार्ड वेअरचे मालक राध्येश्याम मुंदडा यांचे आज औरंगाबाद येथील हॉस्पिटल मध्ये उपचार दरम्यान निधन झाले,मृत्यूसमयी ते 68 वर्षाचे होते
राध्येश्याम मुंदडा यांनी शहरातील विविध व्यापारी संस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर संस्थेत आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.एक प्रथितयश व्यावसायिक म्हणून त्यांचा बीड जिल्ह्यात नावलौकिक होता.
यामध्ये बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव होते तर संस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रसिक फाउंडेशनचे ते संस्थापक कोषाध्यक्ष होते सामाजिक क्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ बीड चे अधक्ष्य पद ही त्यांनी भूषवले होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे
आज बीड मधील अमरधाम स्मशान भूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी शहरातील व्यापारी व त्यांचे मित्र परिवार उपस्थित होता