बीड- तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा रुग्णालयात नोकरीला लागून तिथेच गुत्तेदारी करत करत सत्ता पालट झाल्यावर धनंजय मुंडे यांच्या दारात पायघड्या घालणारा गुत्तेदार गणेश बांगर नेमका कोणाचा आहे ?असा प्रश्न दोन्ही मुंडे समर्थकांमध्ये चर्चिला जात आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन चार वर्षात कोट्यवधी रुपयांची खरेदी ज्या व्यक्तीने केली त्यातील एक महत्वाच नाव म्हणजे गणेश बांगर.पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री असताना या बांगर ने त्यांच्या पुढे पुढे करत राजरतन जायभाये,अजिनाथ मुंडे यांच्या मार्फत सप्लाय चा उद्योग सुरू केला.
2019 ला सत्तांतर झाले अन धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री झाले.त्यानंतर या गणेश बांगर ने त्यांच्या समोर पायघड्या घालण्यास सुरवात केली.कोरोनाच्या काळात बांगर,जायभाये आणि अजिनाथ मुंडे यांनी तब्बल 110 कोटी रुपयांच साहित्य सप्लाय केलं.
कागदोपत्री खरेदी दाखवून या तिघांनी जिल्हा रुग्णालयात निव्वळ गोंधळ घातला.आता ही खरेदी वादात सापडली आहे.पंकजा मुंडे यांची सत्ता गेल्यावर या बांगर ने जीप चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसाला पाच दहा लाख रुपये खर्च केले अन हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सक्रिय झाला.
आता त्याला तलवाडा जिल्हा परिषद गटातून सदस्य होण्याची स्वप्न पडू लागली आहेत,त्यामुळे त्याने आता सप्लाय मधून कमावलेली कोट्यवधी रुपयांची माया मुंडेंच्या अन पंडितांच्या पुढे पुढे करण्यात खर्च करायला सुरुवात केली आहे.
जो देता वो नेता अशी कार्यपद्धती असलेल्या गणेश बांगर सारख्या लोकांमुळे दोन्ही मुंडे यांच्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र प्रश्न पडला आहे की हा बांगर नेमका कोणाचा आहे.केवळ सत्तेत असलेल्यांच्या पुढे पुढे करून कोट्यवधी रुपये छापणाऱ्या या अशा लोकांना नेत्यांनी आता तरी दूर करावे अशी मागणी होत आहे.