July 7, 2022

मतदारसंघातील 25 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !

मतदारसंघातील 25 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !


बीड – बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे माध्यमातून बीड तालुक्यातील 25 गावच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 17 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या 25 गावचा पाणी प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी मिटणार असून पहिल्या टप्प्यात बीड तालुक्यातील 25 गावांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.


बीड तालुक्यामध्ये आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील 25 गावच्या पाणी पुरवठा योजनेस पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची उपस्थिती होती. या योजनेमध्ये बीड तालुक्यात 25 गावांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

यामध्ये शहाजानपूर/कामखेडा, लिंबारूई देवी, पाटोदा बेलखंडी, ढेकणमोहा, उमरद खालसा, उमरद जहाँगीर, काळेगाव हवेली, तळेगाव, वाढवणा, गुंधा, लिंबागणेश, रूईलिंबा, बोरखेड, बाभुळखुंटा, माळापुरी, डोईफोडवाडी, महाजनवाडी, केतुरा, कुमशी, हिंगणी/पारगाव जप्ती, नांदुर हवेली, चव्हाणवाडी, खामगाव, रंजेगाव, कुर्ला आदी गावांचा यामध्ये समावेश आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click