December 10, 2022

शुक्रवारी कोरोनाचे दिडशतक !

शुक्रवारी कोरोनाचे दिडशतक !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1385 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 150 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1235 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 42 आष्टी 16 बीड 24 धारूर 12 गेवराई 3 केज 5 माजलगाव 13 परळी 17 पाटोदा 3 शिरूर 6 वडवणी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 176 रुग्णांना डिस्चार्ज

काल बीड जिल्ह्यात 176 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 6700 झाली असून 2847 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे काल जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 14.16 % होता जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.59% टक्के असून 1 लाख 2098 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1755 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 2930 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1592 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 958 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

देशात दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 2 लाख 51 हजार 209 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 627 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी कमी झाले आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर आता 15.88 टक्क्यांवर आला आहे. मोठी गोष्ट म्हणजे कालपासून देशात 12 टक्के रुग्ण कमी झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 5 हजार 611 इतकी झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 92 हजार 327 झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत तीन लाख 47 हजार 443 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 80 लाख 24 हजार 771 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click