बीड – केज नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक बाळासाहेब जाधव यांच्या मालकीच्या चंदनाच्या गोदामावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घातला.या ठिकाणी तब्बल 88 हजाराचा माल जप्त केला.
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अवैध धंदे जिल्हा भरात जोरात सुरू असल्यामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्याविरुद्ध छापासत्र सुरू केले आहे.बुधवारी कुमावत यांच्या पथकाने अंबाजोगाई भागात चंदन चोरांच्या गोदामावर छापा घातला.हे गोदाम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नूतन नगरसेवक बाळासाहेब जाधव यांचे आहे हे विशेष. या ठिकाणी पोलिसांनी 85 हजाराचा माल जप्त केला.
अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांचे शेतात बाळासाहेब दत्तात्रय जाधव राहणार केज हा बेकायदेशीररित्या स्वतःची फायदा करीता काही लोकांना एकत्र करून परिसरातील चंदनाची झाडे चोरून तोडून देवराव कुंडगर यांचे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तासून चंदनाचा गाबा काढून पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून सेड मध्ये ठेवलेले ठेवला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे पोलीस आमदार यांनी सदर ठिकाणी 26/01/2022 रोजी साडेदहा वाजता छापा मारला
बाळासाहेब जाधव हा नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला होता.या कारवाईने जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे पुढारी हे अवैध धंदे करण्यात पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे.
सदर ठिकाणी एक इसम जागीच मिळून आले त्यांच्या ताब्यातील पत्र्याचे शेड ची व परिसराची पंचा समक्ष झडती घेता सदर ठिकाणचे पत्र्याचे शेड मध्ये पांढरे दोन पोत्यात पोत्यामध्ये 27 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडा मधून काढलेला चंदनाचा गाबा किमती 67500 हजार रुपये एक मोबाईल किमती 10000 असा एकूण 85500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या ठिकाणी देवराव कुंडगीर यांना चौकशी केली असता या गोदमाचा मालक बाळासाहेब दत्तात्रय जाधव र केज हा असल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी बाळासाहेब जाधव याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.