बीड- शहरातील कबाड गल्ली भागात देशपांडे यांच्या वाड्यात सुरू असलेल्या मटक्याच्या क्लबवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड घातली. या ठिकाणी माजी सभापती बाळासाहेब जाधव यांचा क्लब सुरू होता,पोलिसांनी 78 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे,जाधव फरार झाला आहे.
बीड शहरातील कबाड गल्ली गल्ली मध्ये देशपांडे यांचे वाड्यात बंदर रूम मध्ये जुगार अड्डा तयार करून काही इसम व बाळासाहेब जगन्नाथ जाधव हे बेकायदेशीर रित्या स्वतःचे फायदा करिता एकत्र बसून कल्याण मटका जुगाराची आकड्यावर लोकांकडून पैसे लावून एजंटांमार्फत घेतलेल्या चिठ्ठ्या छाटणी करत बसले आहेत अशी माहिती शपंकज कुमावत यांना मिळाली.त्यानंतर मा. कुमावत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोउपनि बाळाराजे दराडे व पथकाला त्या ठिकाणी छापा घालण्यास सांगितले.
तेव्हा रविवारी रात्री दराडे व इतरांनी देशपांडे यांच्या वाड्यात सुरू असलेल्या बाळासाहेब जाधव यांच्या मटक्याच्या अड्यावर छापा घातला.यावेळी त्या ठिकाणी असलेले लोक पळून गेले,केवळ एकच आरोपी आढळून आला.
या ठिकाणी झडती घेतली तेव्हा रूम मध्ये कल्याण मटका जुगाराचे आकडे छाटणी साठी लागणारे साहित्य व मोबाईल व्हाट्सअप वर येणाऱ्या धंद्यासाठी लागणारे मोबाईल प्रिंटर एकूण 18,50000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालक एजंट असे एकूण 78 लोकांविरुद्ध पोउपनी बाळाराजे दराडे यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीड शहर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.