December 10, 2022

कोरोनाचा जोर कमी होऊ लागला !

कोरोनाचा जोर कमी होऊ लागला !

बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1165 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 177 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 988 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 44 आष्टी 5 बीड 47 धारूर 7 गेवराई 8 केज 22 माजलगाव 10 परळी 11 पाटोदा 5 शिरूर 4 वडवणी 14 असे रुग्ण आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात 1547 रुग्णांवर उपचार सुरू

काल बीड जिल्ह्यात 72 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली आहे
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 5826 झाली असून 2847 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्याचा रिकवरी रेट 95.84% टक्के असून 1 लाख 1432 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत बीड जिल्ह्यात सध्या 1547 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

राज्यात आज करोनाचे ४० हजारांवर नवे रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ४० हजार ८०५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २७ हजार ३७७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरत राज्यात आज एकूण २ लाख ९३ हजार ३०५ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ७० लाख ६७ हजार ९५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१५ टक्के झाले आहे.

राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण नाही.
दरम्यान, आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत राज्यात एकूण २ हजार ७५९ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

देशातील कोरोनाची तिसरी लाट अद्याप कायम असून देशात दैनंदिन रुग्णवाढीत सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

हाच आकडा शनिवारी 3 लाख 33 हजार एवढा होता. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात दोन लाख 43 हजार 495 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. पण अद्यापही 22 लाख 49 हजार 335 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या देशात एकूण 5.69 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात काल दिवसभरात कोरोनासाठी 14 लाख 74 हजार 753 नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये 20.75 टक्के लोकांना लागण झाल्याचे आढळले.

कोरोनामुळे देशातील मृत्यूचे प्रमाण 1.24 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 93.07 टक्के आहे. सक्रिय प्रकरणे 5.69 टक्के आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या बाबतीत भारत आता जगात सहाव्या स्थानावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click