December 6, 2022

कोरोना शनिवारी तीनशे पार !

कोरोना शनिवारी तीनशे पार !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गेल्या आठ दिवसापासून झपाट्याने वाढतो आहे गेल्या चार दिवसात दोनशे ते तीनशे पर्यंत पोहोचलेला आकडा शनिवारी तीनशे पार गेला जिल्ह्यातील वाढते रुग्ण संख्या ही आरोग्य विभागासाठी आव्हाने निर्माण करणारी करत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे

बीड जिल्ह्यात कोरूना रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याची संख्या गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे पूर्वी दहावीच्या घरात असलेली रुग्णसंख्या अचानक पणे शंभरी पार करून आता पाचशे चा टप्पा वाटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेऊन प्रशासनाने अधिकचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

बीड जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 2414 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 2107 रुग्ण निगेटिव आढळून आले तर तीनशे सात रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामध्ये सर्वाधिक 81 रूग्ण हे अंबाजोगाई येथील आहेत तर शिरूर आणि धारूर मधील रुग्णांची संख्या सर्वात कमी म्हणजे आठ इतकी आहे बीडमध्ये 46 आष्टी मध्ये 16 गेवराई येथे 19 केज येथे 20 माजलगाव येथे 32 परळी येथे 41 पाटोदा येथे एकोणीस आणि वडवणी मध्ये सतरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

गेल्या आठ दिवसापासून केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील आणि देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा देखील झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारपेठा दुकाने मॉल लग्न या ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे करुणा रुग्णांची संख्या वाढते आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःला सोबतच इतरांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे तरच कोरोना आटोक्यात येऊ शकतो

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click