July 7, 2022

वादग्रस्त डॉ अमोल गित्ते बीडचे नवे डीएचओ !

वादग्रस्त डॉ अमोल गित्ते बीडचे नवे डीएचओ !

बीड- कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळीकडे संचारबंदी सुरू असताना कायदा मोडून जिल्हाबंदीचे उल्लंघन करणाऱ्या डॉ अमोल गित्ते यांची बीड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या डॉ गित्ते यांच्या गाडीत त्यावेळी दारूच्या बाटल्या आणि साडेसहा लाख रुपयांची रोकड सापडली होती.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.आता हे महाशय बीडला येणार असल्याने बिडकरांचे आरोग्य धोक्यात येणार की सुधारणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीड जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी पद गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून रिक्त आहे.राज्य शासनाने नुकतीच राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी प्रसिध्द केली.यामध्ये 16 जणांचा समावेश आहे.

बीड येथील रिक्त पदावर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असणारे डॉ अमोल रामभाऊ गित्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे तेच डॉ गित्ते आहेत ज्यांच्या गाडीत जालना जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान दारू सापडली होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेव्हा निर्बंध कडक होते,जिल्हाबंदी आणि संचारबंदी सारखे कडक नियम होते.त्याकाळात डॉ अमोल गित्ते हे जिल्हाबंदी मोडून जालना जिल्ह्यात गेले होते.रात्रीच्या गस्तीपथकाने डॉ गित्ते यांची चौकशी केली असता त्यात दारू सापडली होती.

त्याचसोबत त्यांच्या गाडीत साडेसहा लाखाच्या पेक्षा जास्त रोकड रक्कम आढळून आली होती.या प्रकरणी डॉ गित्ते याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

आता हेच डॉ अमोल गित्ते हे बीडला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून येत आहेत.त्यामुळे बिडकरांची चिंता वाढणार हे नक्की.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click