बीड – गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथे चंदन चोरांची टोळी एकत्रित आल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून तब्बल साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी पोलिसांनी 17 आरोपींना अटक केली आहे. तीन आरोपी फरार आहेत.पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील विष्णू साहेबराव बांगर हा बेकायदेशीररित्या काही लोकांना एकत्र करून परिसरातील चंदनाची झाडे चोरून तोडून स्वतःच्या मोरवड येथील शेतात पत्र्याचे शेडमध्ये चंदनाचा गाबा काढून पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून सेड मध्ये ठेवलेले माल ठेवला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली .
चंदन चोरांची टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुमावत यांच्या पथकाने मोरवड येथे छापा घातला.यावेळी तब्बल 17 लोक या ठिकाणी आढळून आले.त्यांच्याकडून सात लाख 87 हजार रुपयांचे 328 किलो चंदन,चार मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 89 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून फरार तीन आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.