October 5, 2022

ब्लड ऑन कॉल बंद होणार !

ब्लड ऑन कॉल बंद होणार !

बीड – राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी मध्ये सुरू असलेली ब्लड ऑन कॉल ही योजना 31मार्च 22 पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.शासनाने हा निर्णय मागे घेण्या बाबत विचार करण्याची मागणी होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी मधून गरजू रुग्णांना उपचार सुरू असलेल्या ठिकाणी रक्त उपलब्ध व्हावे याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यासाठी जीवन अमृत सेवा अर्थात ब्लड ऑन कॉल सेवा सुरू करण्यात आली होती.

त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी स्वरूपात कर्मचारी नियुक्त केले होते.मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात या योजनेला बहुतांश जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या योजनेवर राज्यात प्रति बॅग किमान 699 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख 42 687 रुपये खर्च होत आहे.होणारा खर्च हा अति असल्याने आणि मिळणारा प्रतिसाद अत्यल्प असल्याने शासनाने ही योजना 31 मार्च 2022 नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अनेक कर्मचारी हे गेल्या दोन वर्षांपासून नोकरीस आहेत.आता ही योजना बंद करण्याचे आदेश दिल्याने कंत्राटी नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने ही योजना बंद करू नये अशी मागणी होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click