बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 239 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत वाढत्या रुग्ण संख्या लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयाने 3 वार्ड सज्ज केले असून आयटीआय मध्ये देखील केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण गेल्या आठ दहा दिवसापासून वाढत आहेत.सोमवारी शंभर च्या आसपास असणारी संख्या गुरुवार पर्यंत अडीचशेच्या घरात गेली आहे.वाढती रुग्णसंख्या ही प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षत घेता जिल्हा रुग्णालयात वार्ड क्र 6,7 आणि 8 मध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.तसेच आयटीआय मध्ये देखील कोविड केयर सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.रुग्णालय प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 2191 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले त्यात 239 पॉझिटिव्ह तर 1952 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.अंबाजोगाई 64,आष्टी 20,बीड 57,धारूर 07,गेवराई 12,केज 16,माजलगाव 08,परळी 33,पाटोदा 03,शिरूर 10 आणि वडवणी मध्ये 09 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील आणि देशातील रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.गुरुवारी सकाळी देशात तीन लाखापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .