बीड- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बोकाळलेला भ्रष्टाचार आणि एजंटांची वाढती दादागिरी हा विषय सर्वश्रुत आहे.या कार्यालयातील वाहन निरीक्षक रविकिरण भड याच्या विरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात भड याच्यासह एका खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO)
येथील लाचखोरी जग जाहिर आहे. या बाबतीत एक तर कोणी रितसर तक्रार करत नाही. सामाजिक कार्यकर्ते ऍड. बक्शु अमीर शेख यांनी या संदर्भात पाठपुरावा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पंरतु सप्टेंबर 2021 ते जानेवारी2022 पर्यत पाठपुरावा करून आज दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी सकाळी 08 वाजता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात FIR NO. 26 ने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथील वाहन निरिक्षक रविकिरण भड व त्याची लाच गोळा करणारा खासगी व्यक्ति प्रविण गायकवाड या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक श्री. खाडे व उप अधिक्षक भरत राउत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते ऍड बक्शु अमीर शेख यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हप्तेखोरी विरोधात ही वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे. जिल्ह्य़ातील विविध विभाग कडून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय बीड ला 24 लाख महीना हप्ता गोळा होण्याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी पुराव्यानिशी मुख्यमंत्री सह वरिष्ठांनां दिलेल्या तक्रारीत केली आहे.
या तक्रारीनंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर अधिकारी आणि खाजगी इसमावर गुन्हे दाखल केल्याने या विभागातील प्रकार चव्हाट्यावर आले आहेत.