केज – गेल्या साडेसात वर्षांपासून केज वासीयांच्या खांद्यावर असलेलं काँग्रेस पक्षाचं जोखड अखेर शहरातील नागरिकांनी उतरवून फेकल आहे.खा रजनीताई आणि अशोक पाटील यांच्या काँगेस पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या .राष्ट्रवादी काँग्रेस ला पाच तर जनविकास आघाडी ला सर्वाधिक आठ जागा प्राप्त झाल्या आहेत.
केज नगर पंचायत च्या निवडणुकीकडे राज्याचे नव्हे तर दिल्लीचे देखील लक्ष लागले होते.काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य खा रजनीताई पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील हे गेल्या साडेसात वर्षांपासून अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून कारभार पाहत आहेत.
या निवडणुकीत भाजपने आपला एकही अधिकृत उमेदवार चिन्हावर न उभा करता एक प्रकारे काँगेस ला मदतच केली होती.मात्र साडेसात वर्षांपासून एकहाती सत्ता असताना देखील शहराचा विकास तर सोडाच पण बकालपण देखील दूर न करू शकलेल्या काँग्रेस ला मतदारांनी सत्तेतून दूर केलं आहे.
गेल्या साडेसात वर्षात काँग्रेस नेतृत्वाने शहराच्या विकासाकडे पाठ फिरवली त्याचा परिणाम नगर पंचायत निवडणुकीत दिसून आला.रमेश आडसकर,हारून इनामदार यांच्या नेतृत्वाखालील जनविकास आघाडीने आठ जागा मिळवल्या.तर बजरंग सोनवणे यांचा पदरात पाच जागा पडल्या.
या निकालानंतर केज वासीयांनी काँग्रेसचे जोखड मानगुटीवरून फेकून दिले अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.