January 30, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पराभूत !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पराभूत !

केज – जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतःसह पत्नीला देखील विजय मिळवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना स्वतःची मुलगी डॉ हर्षदा हिस मात्र निवडून आणता आले नाही.केज नगर पंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणाऱ्या डॉ हर्षदा चा अशाबाई कराड यांनी पराभव केला.या पराभवामुळे सोनवणे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

केज नगर पंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठित झाली होती.या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी स्वतःची मुलगी डॉ हर्षदा ला मैदानात उतरवले होते.मुलीच्या विजयासाठी सोनवणे यांनी जिल्ह्यातील इतर नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारकडे कानाडोळा केला होता.

मुलीचा राजकारणातील प्रवेश विजयाने व्हावा यासाठी सोनवणे यांनी सर्व ताकद पणाला लावली होती.मात्र केजच्या जनतेने जनविकास आघाडीच्या आशाबाई कराड यांच्या पारड्यात आपला कौल दिला.

स्वतःच्या मुलीचा पराभव न वाचवू शकलेल्या बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click