बीड – बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात सिमेंट रस्ते,नाल्या आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे.दोन दिवसात तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आ क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.जनतेच्या विश्वासाला कधीही तडा देणार नाही अशी ग्वाही यावेळी आ क्षीरसागर यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी आ.संदिप क्षीरसागर पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत. कठीण परिस्थितीत मोठ्या प्रमाणात आ.संदिप क्षीरसागर बीड मतदार संघासाठी निधी खेचून आणत आहेत. काल 2 कोटी रूपयांच्या विकास कामांचे नारळ फोडल्यानंतर आज पुन्हा पेठ बीड भागातील प्रभाग क्र.4, 18 व 19 व इतर भागात 2 कोटी 16 लक्ष रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मंगळवार दि.18 जानेवारी 2022 रोजी पेठ बीड भागातील प्रभाग क्र.4, 18 व 19 या भागात शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 16 लक्ष रूपयांच्या रस्ता, नाली बांधकाम या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी बहिरवाडीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते आसाराम गायकवाड, वैजीनात तांदळे, बबन गवते यांच्यासह अशोक वाघमारे, दादा हतागळे,यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये प्रभाग क्र.4 मधील तुळजाभवानी मंदिर ते अशोक वाघमारे, डोंगरे ते मच्छिंद्र वडमारे व सुमित वडमारे ते बबन जोगदंड यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रूपये, प्रभाग क्र.4 मध्ये ताठे यांचे घर ते सार्वजनिक शौचालय व बबन रेगुडे यांचे घर ते दिलीप कांबळे यांच्या घरापर्यंत (नागोबा गल्ली) सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे 50 लक्ष 80 हजार रूपये, प्रभाग क्र.4 मध्ये चंद्रकांत कदम यांचे घर ते आंबेडकर सभागृहा पर्यंत व दत्ता खडके ते पेठ बीड पोलीस स्टेशन रोडपर्यंत (वीरशैव कॉलनी) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 37 लक्ष 20 हजार रूपये, प्रभाग क्र.4 मध्ये हिरामन गायकवाड ते कांबळे यांचे घरापर्यंत (रमाईनगर) व बंडु निसर्गंध यांचे घर ते नाथापुर रोड रेणुकानगर पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 32 लक्ष 80 हजार रूपये, प्रभाग क्र.17 मधील सुभाष कॉलनी येथे पोपट गायकवाड यांचे घर ते चाऊस यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रूपये, 1.प्रभाग क्र.17 मधील सुभाष कॉलनी येथे पोपट गायकवाड यांचे घर ते चाऊस यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 20 लक्ष, प्रभाग क्र.19 मधील राजु वाघमारे ते संतोष जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रूपये या कामांचा समावेश आहे.