बीड- गेल्या तीन चार दिवसांपासून वाढत असलेला कोरोनाचा आकडामंगळवारी 144 वर जाऊन पोहचला.आष्टी,परळी,बीड आणि अंबाजोगाई मध्ये होणारी रुग्णवाढ ही चिंतेत भर घालणारी आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्णवाढत आहेत.जिल्हा रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.मंगळवारी 1650 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 144 पॉझिटिव्ह तर 1506 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात अंबाजोगाई 19,आष्टी 16,बीड 37,धारूर 10,गेवराई 07,केज 03,माजलगाव 15,परळी 26,पाटोदा 10 आणि वडवणी मध्ये 1 पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असताना राज्यातील रुग्णांमध्ये देखील वाढ होत असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा वाढत असलेला आलेख पाहता पुढील आठवड्यात शाळा सुरू करण्या बाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे .