बीड – गेल्या सहा सात महिन्यापासून कमी असलेला कोरोनाचा जोर वाढू लागल्याचे दिसताच जिल्हा रुग्णालयात गुत्तेदार मंडळींचा वावर वाढला आहे.विशेष म्हणजे गणेश बांगर याच्या घरून हा सगळा प्रकार मॅनेज केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे .
बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत.मात्र आपत्ती मध्ये देखील इष्टापत्ती शोधणारे काही लोक असतात.
या लोकांनी कोरोना वाढू लागताच आपलं दुकानं चमकवण्यासाठी पळापळ सुरू केली आहे.बीड जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गायब असलेले बांगर,जायभाये,चव्हाण,मुंडे सारखे गुत्तेदार पुन्हा एकदा चमकू लागले आहेत.
विशेष म्हणजे सीएस डॉ सुरेश साबळे यांनी यापूर्वी खरेदी केलेल्या साहित्याचा वापर जास्तीत जास्त करण्याचे आदेश दिले असताना देखील स्टोर किपर ठाकर आणि रियाज या दोघांना हाताशी धरून गणेश बांगर याच्या घरूनच टेंडर फायनल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कोरोना वाढू लागल्याने पीपीई किट,अँटिजेंन किट,ग्लोव्हज,मास्क यासह इतर वस्तू खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे .
एकीकडे जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात यावा आणि आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सीएस डॉ साबळे यांनी या गुत्तेदार मंडळींचा हा डाव हाणून पाडावा असे बोलले जात आहे.