बीड – जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.शनिवारी 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते तर रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल दुप्पट म्हणजे 125 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.बीड,परळी,अंबाजोगाई या तालुक्यातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतो आहे.विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मोठ्या गतीने वाढत आहे.जिल्ह्यातील 1814 रुग्णांची तपासणी केली असता 125 पॉझिटिव्ह तर 1689 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील अंबाजोगाई 24,आष्टी 09,बीड 23,गेवराई 8,धारूर 3,केज 3,माजलगाव ,पाटोदा 10,परळी 26,शिरूर 5,वडवणी मध्ये 4 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे.कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासोबत गरज पडल्यास उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात देखील यंत्रणा सक्षम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.