August 9, 2022

जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह !

बीड- जिल्ह्यातील आष्टी,परळी आणि अंबाजोगाई ने कोरोना रुग्णसंख्येचा वेग पकडला असल्याने चिंता वाढली आहे.बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2265 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 64 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2201 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 13 बीड 5 धारूर 2 गेवराई 1 केज 3 परळी 16 पाटोदा 3 शिरूर 1 वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत

गेल्या 24 तासात महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात महाराष्ट्रात 46,406 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 28,867 रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ कर्नाटक 25,005, बंगाल 23,467 आणि तामिळनाडू 20,911 रुग्ण आढळले आहेत. एकूण नवीन रुग्णांपैकी 54.74 टक्के या पाच राज्यांमधून आले आहेत. तर यातील महाराष्ट्रात 17.56 टक्के रुग्ण आहेत.

भारतात आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा धडकी भरवणारा वेग यला मिळाला. गेल्या 24 तासात देशात 2,64,202 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत हा आकडा 6.7 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना संसर्गाचा दर आता 14.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. यात देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ही 5,753 नोंदवण्यात आली आहे.

कालच्या तुलनेत देशात आज 16,785 अधिक रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी देशात कोरोना रुग्णांची संख्या ही 2,47,417 इतकी होती. तर आज हीच संख्या 2,64,202 वर पोहचली आहे. यात 1,09,345 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12,72,073 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 219 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आत्तापर्यंत 4,85,350 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click