बीड – आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडण्यात थेट सहभाग निष्पन्न झाल्यानंतर आणि गुन्हे दाखल होवुन पोलिसांकडून अटकेची कारवाई झालेल्या नागरगोजे नामक दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रल्हाद नागरगोजे ( जी प प्राथमिक शाळा कुककडगाव)आणि विजय नागरगोजे (सहशिक्षक,काकडहिरा) अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत .
राज्यात उघडकीस आलेल्या आरोग्य भरती घोटाळ्यात मंत्र्यलयीन अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत अनेक जण गजाआड गेले.यामध्ये बीड जिल्ह्यातील दहा ते बारा जणांचा समावेश आहे.प्रल्हाद नागरगोजे या शिक्षकाने आरोग्य भरती घोटाळ्यात संजय सानप,राजेंद्र सानप यांच्या मदतीने पेपर फोडण्याचे उद्योग केले होते.
तर विजय नागरगोजे या शिक्षकाने टीईटी घोटाळ्यात वर पासून खालपर्यंत फिल्डिंग लावली होती.किमान पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत रक्कम या लोकांनी जमा केली होती.या दोन्ही शिक्षकांना जिल्हा परिषद सीईओ अजित पवार यांनी निलंबित केले आहे .