बीड – अंबाजोगाई तालुक्यातील सौन्दना येथे गुटख्याची तस्करी पोलिसांनी उघडकीस आणली आहे.तब्बल साडेतीन लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे.कुमावत यांच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून धाडसत्र सुरू केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील सौदना येथे गोविंद उद्रे हा त्याची राहते घराच्या पाठीमागील पत्र्याचे शेड मध्ये गोवा विमल आर एम डी व इतर गुटख्याच्या मालास महाराष्ट्र राज्यात बदी असतांनाही तो चोरटी विक्री साठी आणून साठवून ठेवला आहेअशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांना मिळाली .
त्यानंतर कुमावत यांनी पोलीस ठाणे केज येथील सपोनि मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे स्टाफला पाठवून सदर बातमीचे दोन्ही ठिकाणी 20.00 वाजता छापा मारला त्यावेळी तेथे गोविंद उद्रे याच्या पत्र्याच्या शेडमध्ये स्टार गोल्ड,सीतार, एक्का,आर एम डी,गोवा आणि विमल गुटखा आढळून आला.
तब्बल 329620 चा माल मिळून आल्याने सदर आरोपीस मुद्देमाल सह पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे हजर करून बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे