November 26, 2022

जुगारी मास्तरांवर एवढी मेहेरबानी कोणाची !

जुगारी मास्तरांवर एवढी मेहेरबानी कोणाची !

बीड – ज्ञानदानासारखे पवित्र काम करण्यासाठी ज्यांनी व्रत हाती घेतले त्या हातात पत्याचे डाव आले अन पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाच मास्तरांना निलंबित केले,मात्र त्यातील तिघांना तालुक्याबाहेर मुख्यालय देण्याऐवजी बीड लाच कसकाय दिले.या जुगारी मास्तर लोकांसाठी सीईओ कडे चुकीची फाईल कोणी पाठवली,का सीईओ यांच्यावर कोणी दबाव आणला ज्यामुळे नियमबाह्य पध्दतीने या जुगाऱ्याना लेखा व वित्त विभागात काम करण्याचे आदेश दिले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत .

बीड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नावालाच नोकरीस असणारे मात्र संघटनेच्या नावाखाली शिकवणे सोडून इतर सगळे रिकामे उद्योग करणारे शिक्षक हरिदास घोगरे,भगवान पवार आणि बंडू काळे या तीन शिक्षकासह संस्थेवरील दोन शिक्षकांना पत्ते खेळताना जुगार अड्यावर पकडण्यात आले.

पोलिसांनी या सर्वांची वरात ग्रामीण पोलीस ठाण्यात नेली,या बाबत जाहीरपणे चर्चा सुरू झाल्यानंतर जी प सीईओ अजित पवार यांनी या शिक्षकांवर कारवाई बाबत प्रभारी शिक्षणाधिकारी अजय बहिर यांना वारंवार सांगितले.

प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्या टेबलवर या जुगारी शिक्षकांच्या निलंबनाची फाईल दोन चार दिवस पडून होती,मात्र त्यांनी ती सीईओ यांच्याकडे पाठवायला मुद्दाम उशीर लावला ,शेवटी सीईओ पवार यांनी स्वतःच्या अधिकारात या जुगाऱ्याना निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या जुगाऱ्याना पाठीशी घालण्याचा बहिर यांचा नेमका हेतू काय आहे,त्यांचे अन या जुगाऱ्यांचे काही हितसंबंध आहेत का ? अशी चर्चा होत आहे.

जुगार अड्यावर धाड घालण्याची अन गुन्हा दाखल होण्याची कारवाई होऊन दहा दिवस उलटल्यानंतर या ठिकाणी सापडलेल्या पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आले.यात जिल्हा परिषदेचे शिक्षक हरिदास घोगरे,भगवान पवार आणि बंडू काळे यांचासमावेश आहे.या तिघांना निलंबित केल्यानंतर त्यांना निलंबन काळात मुख्यालय म्हणून दुसऱ्या तालुक्यात नियुक्ती देणे आवश्यक होते.

मात्र या तिघांनाही बीडच्या लेखा व वित्त विभागात नियुक्ती दिली आहे.हे शिक्षक कोणाच्या मागेपुढे करणारे आहेत,कोणाच्या पीए सोबत यांची उठबस आहे,शिक्षणाधिकारी अजय बहिर हे यांच्यावर एवढे का मेहरबान आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.जुगार खेळताना सापडल्यावर त्यांना निलंबित केले असल्याने त्यांना तालुक्याबाहेर काम करण्याचे आदेश देण्या ऐवजी सीईओ यांना कोणी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली याबाबत चर्चा सुरू आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click