January 30, 2023

राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षक नागरगोजे ला अटक !

राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षक नागरगोजे ला अटक !

बीड – आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी बीडमध्ये कारवाई करुन एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक केली आहे. नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून मागील 15 दिवसांपासून पुणे पोलीस त्याचा शोध घेत होता. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर त्याने पथक शाळेत येण्यापूर्वीच गुंगारा देऊन फरार झाला होता. मात्र बुधवारी (दि.5) पथकाला त्याचा ठावठिकाणा समजला आणि त्याच्या मुसक्या आवळल्याचे सूत्रांनी सांगितले.आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणात नागरगोजे याला अटक केली आहे.


आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात त्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी तसेच म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत 35 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पेपरफुटी प्रकरणात संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, पेपर कोणताही असू द्या यामध्ये दलालांची एक साखळी असून जे लोक प्रश्नपत्रिका तयार करतात त्यांच्या जवळील आहेत. हे सर्व दलाल विद्यार्थ्यांना एकत्रित करुन आणि परीक्षेच्या एक दिवसआधी परीक्षार्थींना सर्व प्रश्न पाठ करुन द्यायचे असे या दलालांचे काम होते असे त्यांनी सांगितले.यापूर्वी पेपरफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथील शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे याला अटक करण्याात आली होती.

याच उद्धव नागरगोजेचा आणि काल अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळचा संबंध असल्याचे बोलले जातंय. तसेच वडझरी पॅटर्नच्या संजय सानप याला ज्या मार्गाने गट ‘क’ची प्रश्नपत्रिका मिळाली तशीच नागरगोजेला मिळाल्याची चर्चा आहे.बीड मधील नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात ज्याप्रमाणे संजय सानपचे उमेदवार थांबले होते. तसेच काल अटक करण्यात आलेल्या नागरगोजेचे उमेदवार नगर रोडवरील एका मंगल कार्यालयात थांबले असल्याचं सांगितले जात आहे. तसेच या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा संबंध अनेक भरती प्रकरणाशी असल्याची चर्चा आहे.तर अटकेत असलेला आरोपी सुखदेव डेरे आणि नागरगोजे एकमेकांचे खास असल्याचे सांगितले जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click