बीड -शिक्षक अन संघटनेचे अध्यक्ष असतानाही जुगार खेळण्याचा छंद पाच जणांच्या अंगलट आला आहे.जुगार अड्यावर पडलेल्या धाडीमध्ये गुन्हा दाखल झालेल्या पाच शिक्षकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबित केले आहे.यामध्ये तीन जण जिल्हा परिषदेचे तर दोन जण खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत.
शहरानजिकच्या तळेगाव शिवारातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसापूर्वी जि.प.प्रशासनाने या शिक्षकांची माहिती मागवून घेतली. त्यानंतर गुरुवारी या पाचही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.मात्र या निलंबित शिक्षकांना बीड तालुक्यातच वेगवेगळ्या विभागात नियुक्ती दिल्याने हा निर्णय वादग्रस्त होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक हरिदास जनार्धन घोगरे (रा.नंदनवन कॉलनी बीड) प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष भगवान आश्रुबा पवार (रा.काळेगाव हवेली ता.बीड), भास्कर विठ्ठल जायभाय (रा. काकडहिरा ता.पाटोदा),अशोक रामचंद्र सानप (रा.कालिकानगर बीड),बंडू किसन काळे (रा.कालिकानगर बीड ) अशी निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावर यांच्यासह त्यांच्या पथकाने तळेगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून 50 जुगार्यांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह 50 जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीसांनी या कारवाईत जुगार्यांकडून 75 लाखांचा मुद्देमाल जुप्त केला होता
महत्वाचे म्हणजे या कारवाईत गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बीड जिल्हा परिषदेचे 5 शिक्षकांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान नंतर जि.प.प्रशासनाने या जुगारी शिक्षकांची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे मागीतली होती. पोलिसांकडून ती माहिती पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली, त्यानंतर गुरुवारी या 5 शिक्षकांवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली.