बीड- केज,अंबाजोगाई, गेवराई, परळी सह बीड शहरात जुगार,मटका,गुटखा,वाळू वाल्यांवर कारवाई केल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बुधवारी माजलगाव शहरात सुरू असलेल्या मटका,जुगार अड्यावर छापे घालून दीड लाख रुपयांचा माल जप्त केला.कुमावत यांच्या धसक्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
माजलगाव शहरात वडर वाडा येथे जुनी नगरपालिका समोरील रोडच्या बाजूला गोरख वडर यांचे मोकळ्या जागेतील पत्र्याचे शेड बाजूला मटका मालक शेख इर्शाद इतर यांनी काही लोकांना एकत्र बसून स्वतःचे फायद्याकरता कल्याण मटका पैसे लावून कल्याण मटका जुगार खेळ जुगाराचा खेळ खेळतआहे तसेच मोठ्या माधव मांड्यामध्ये पिलाजी शिंदे यांचे घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये इसम नामे तोपिक सय्यद विनापरवाना बेकायदेशीर राजश्री लुटो ऑनलाईन लॉटरी जुगार हा लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून ऑनलाईन लॉटरी जुगार खेळवीत आहेअशी माहिती पोलिसांना मिळाली .
प्राप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पोलीस ठाणे केज येथील सपोनि मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे स्टाफला पाठवून सदर बातमीचे दोन्ही ठिकाणी 15.20 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी कल्याण मटका बारा ॲसं जागीच मिळून आले त्यांच्याकडून नदी व जुगाराचे साहित्य असा एकूण 67060 रू सामान मिळून आल्याने 12 लोक व मूळ मालक असे एकूण 19 लोकांविरुद्ध पोस्ट माजलगाव येथे बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे
त्यानंतर सायंकाळी पावणे पाच वाजता राजश्री ऑनलाइन लॉटरी येते छापा मारला असता सदर ठिकाणी ऑनलाइन जुगार खेळणारा व खेळविणारा इसम जागीच मिळून आले व एक इसम पळून गेला त्यांच्याकडून नगदी व ऑनलाईन लॉटरी झुगारा साठी उपयोगात येणारे साहित्य ल असा एकूण .47.300 रुपये चा माल जप्त करून एकूण 4 आरोपी विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांची फिर्याद वरून पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .