September 30, 2022

यांच्या हातात जिल्हा ! बघा अन लोकहो तुम्हीच ठरवा !

यांच्या हातात जिल्हा ! बघा अन लोकहो तुम्हीच ठरवा !

बीड- कोणत्याही जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे तीन अधिकारी अत्यंत महत्वाचे असतात,विशेषतः कोरोनाच्या काळात यांच्यावर मोठी जबाबदारी आहे,मात्र हे अधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात किती बेजबाबदार वागतात अन यांच्या हातात जिल्ह्यातील लोकांची सुरक्षा अन आरोग्य आहे हे पाहिल्यावर काय होणार बीड कर नागरिकांना असा प्रश्न पडतो आहे.

ग्रामीण भागाचा विकास अन सुरक्षा ,आरोग्य ज्यांच्या हातात आहे असे सीईओ अजित पवार हे मास्क हनुवटीवर घालून बसलेले दिसत आहेत .

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत आग्रही आहेत,दुसरीकडे बहुतांश जिल्ह्यातील प्रशासनाने निर्बंध कडककेले आहेत.बीडच्या जिल्हाधिकारी यांनी देखील निर्बंध कडक केले आहेत.

या छायाचित्रात जी प सीईओ अजित पवार आणि एसपी आर राजा हे दोघेही विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात हजर असल्याचे दिसत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्बंध कडक करण्याचे आणि तोंडावरील मास्क बाजूला न करण्याचे सांगत असताना त्यांचेच नावकरी असलेले बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार मात्र कार्यक्रमात मास्क कधी हनुवटीवर तर कधी बाजूला काढून बसलेले पाहायला मिळाले.

दुसरीकडे जिल्ह्याची कायदा अन सुव्यवस्था तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्यांना आहेत ते एसपी आर राजा हे देखील विनामास्क कार्यक्रमास हजेरी लावताना दिसून आले आहेत.

ज्या अधिकाऱ्यांवर नागरिकांना शिस्तीचे धडे अन कायद्याचे पालन करण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे तेच जर अशा पध्दतीने विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असतील तर सामान्य नागरिक काय कायदा पाळणार,अन हे अधिकारी कोणत्या अधिकाराने त्यांना नियमाबाबत सांगणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात विआरडीएल लॅब चे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले ,यावेळी आमदार देखील उपस्थित होते,बहुतांश लोकांनी मास्क घातला होता मात्र हे दोन प्रमुख अधिकारी मात्र विनामास्क कार्यक्रमात हजर असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click