August 9, 2022

गित्ते,राठोड,बांगर,मुंडे,जायभाये, ठाकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !

गित्ते,राठोड,बांगर,मुंडे,जायभाये, ठाकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !

बीड – जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात खरेदी मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ सुखदेव राठोड,तत्कालीन स्टोर किपर अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,राजरतन जायभाये, डॉ रोहिणी बांगर विद्यमान स्टोर किपर ठाकर,रियाज यांच्याबाबत उपसंचालक डॉ माले यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.एवढा सगळा गैरप्रकार जिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर यात विद्यमान सीएस डॉ सुरेश साबळे यांनी मात्र कुठलीही कारवाई केलेली नाही हे विशेष .हे प्रकरण लवकरच ईडी कडे दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी दिली आहे.


बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या एक वर्षांमध्ये कोवीड कार्यकाळात महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या या  योजना राबवित असताना बीड जिल्हा रुग्णालयात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते विद्यमान एसिएस डॉ सुखदेव राठोड तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे आर टी पिसिआर लॅब प्रमुख डॉ रोहिणी बागर औषध भांडार प्रमुख टी एन ठाकर शेख रियाज शेख एजाज यांनी संगममत करून एक रुपयाची वस्तू वीस रुपयाला खरेदी करण्याचा प्रकार या ठिकाणी करण्यात आला आहे

या ठिकाणी बीड जिल्हा रुग्णालयातील बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय रक्तपेढीतील कर्मचारी गणेश बांगर यांनी राजकीय पुढार्‍यांना हाताशी धरून व त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा अशी भूमिका घेत बीड जिल्हा रुग्णालयातील जिल्हाभरातील कार्यकाळात कोवीड सेंटरला साहित्य पुरविण्यासाठी टेंडर भरले या टेंडर प्रक्रियेत बाहेरच्या एजन्सीला संधी देण्यात आली नाही संबंधित एजन्सीला टेंडर काढले असताना कोणत्याही वर्तमानपत्रात याची जाहिरात देण्यात आलेली नाही


संबंधित जिल्हा रुग्णालयात जी खरेदी झाली त्यामध्ये डॉक्टर रोहिणी बांगर व त्यांचा भाऊ गणेश बांगर यांचा मोठा हात असल्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील कार्यकाळातील खरेदीत मोठ्या प्रमाणात आफरा तफर झालेली आहे जवळपास 285 कोटी रुपयेचा निधी जिल्हा रुग्णालय साठी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री सहायता निधी भारत सरकार आरोग्य मंत्री खासदार आमदार जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजनाकडे नियोजनासाठी जिल्हा रुग्णालयातून आलेले प्रस्ताव आपत्कालीन व्यवस्था प्रमुख तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्हा रुग्णालयाला टेंडर दिले त्या टेंडरची प्रक्रिया ऑनलाइन असताना सुद्धा याची जाहिरात द्यायची होती पण एकाही वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही


यामध्ये बांगर बहिण भाऊ जायबाय नामक व्यक्तीने जिल्हा रूग्णालयात दुसर्‍या एजन्सीला संधी न देता स्वतःचाच खिसा भरण्याचे काम या ठिकाणी केले आहे यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयात 1 जानेवारी 2019 पासून ते 2021 डिसेंबर पर्यंत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता यामध्ये डॉक्टर सुखदेव राठोड एसिएस हेच या माहिती अधिकाराचे माहिती अधिकारी आहेत व या सर्व घटनेचे जबाबदारी ही डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या वरती आहे डॉक्टर सुखदेव राठोड हे माहिती अधिकारात माहिती न देता वेळ घालवत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी केला आहे.


या सर्व गैरप्रकाराबाबत उपसंचालक डॉ माले यांची दिपक थोरात यांनी   बीड जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन चर्चा केली,यावेळी डॉ माले यांनी लेखी तक्रार द्या मी कारवाई करतो असे आश्वासन दिले

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click