बीड – परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालत तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास 114 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून वीस आरोपींना अटक केली आहे .
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे घालून धाक निर्माण केलेल्या सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळालेल्या बातमीनुसार परळी शहरातील हनुमान नगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये गुजराचा अड्डा सुरू होता.या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला तेव्हा आरोपी नामे विलास पावडे, सुरेश तरडे ,बालासाहेब मुंडे ,संतोष साळुंके ,राम बदने,प्रल्हाद काळे, प्रेमचंद आव्हाड यांनी काही इसम हनुमान नगर परळी येथेशिवाजी जाधव यांचे पत्र्याचे सेड मधील रूम मध्ये काही इसम एकत्र बसून जुगाराचा अड्डा तयार करून त्यामध्ये कल्याण मटका, मधूर नाईट व मधूर डे जुगाराचे आकडे मोबाईलवर घेऊन जुगाराच्या पट्ट्या छाटीत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी 20 इसम जागीच मिळून आले त्यांचे ताब्यात नगदी व कल्याण मटका, मधूर डे मधूर नाईट मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 1लाख 13310 रुपयांचा मुद्देमाल नगदी व मोबाईल , साहित्य मिळून आले वरील आरोपीचे मोबाईलवर आकडे देणाऱ्या इसमांची माहिती घेऊन नावे निष्पन्न करून एजंट बुक्की मालक असे एकूण एकूण 114 आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे परळी शहर येते कलम 4, 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे