January 28, 2022

जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !

जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !

बीड- जिल्ह्यात मार्च ते जून 2021 या काळात किती रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन देण्यात आले.ते कोठून उपलब्ध केले गेले,कोणत्या डॉक्टर ने सांगितले होते यासह इतर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे फर्मान पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना दिल्याने इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या एसीएस राठोड सह खाजगी डॉक्टर लोकांचे धाबे दणाणले आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली होती.त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कोविड केयर सेंटर आणि खाजगी रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती.

खाजगी रुग्णालयात रेमडीसविर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाची होती.मात्र मोठ्या प्रमाणात रेमडीसविर चा काळाबाजार झाला. विशेषतः या सगळ्यामध्ये एसीएस डॉ सुखदेव राठोड यांच्यासह स्टोर किपर अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,रियाज आणि नितीन चव्हाण यांच्यावर आरोप झाले.

या सगळ्यांवर पोलिसात तक्रार देखील झाली.पोलिसांनी अनेकवेळा चालढकल केल्यानंतर अखेर या लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले.हेडक्वार्टर न सोडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान आता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात मार्च ते जून 2021 दरम्यान किती रुग्ण ऍडमिट होते.आणि त्यातील किती रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन देण्यात आले.त्यानी ते कोठून उपलब्ध केले या बाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click