बीड- स्वतःच्या मालकीच्या जागेत जुगार अड्डा चालू असल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जामीनाबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.मस्के एकीकडे पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे पोलीस मात्र तपास करण्यात गुंग आहेत.या प्रकरणातील इतर 47 आरोपींना जामीन झाला मात्र मस्के यांनी ना जामीन घेतला ना पोलिसांनी त्यांना अटक केली.
बीड शहरानजीक असलेल्या चराठा रोड भागातील यश स्पोर्ट क्लब या पत्याच्या क्लबवर पंकज कुमावत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा मारला.यात तब्बल 47 आरोपी,मोबाईल,चार चाकी,दुचाकी वाहने ,रोख रक्कम असा 75 लाखापेक्षा जात मुद्देमाल जप्त केला.
पत्याचा क्लब सुरू असलेली जागा ही भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला.याबाबत माहिती मिळाल्यानंतर मस्के यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.सदरील जागा आपल्या मालकीची नसल्याचा दावा त्यांनी केला.
या कारवाई बाबत गुरुवारी माहिती घेतली असता जुगार अड्यावर सापडलेल्या 47 आरोपींना बुधवारी दुपारी जामीन मंजूर झाला.मात्र मस्के यांच्या बाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.मस्के यांच्या नावावर जागा आहे की नाही याची खात्री केल्यानंतर तपास पूर्ण करून निर्णय घेण्यात येणार आहे.
एकीकडे पंकज कुमावत यांच्यासारखा अधिकारी बीड ग्रामीण च्या हद्दीत एवढ्या मोठ्या जुगार अड्यावर धाड घालत असेल अन त्यानंतरही जर बीड ग्रामीण पोलीस तपासाच्या नावाखाली मस्के सारख्याना सहकार्य करत असतील तर कुमावत यांच्या कारवाईला बाधा येऊ शकते अशी चर्चा होत आहे.