April 1, 2023

पालकांनो मुलांना लस देण्यासाठी हे करा !

पालकांनो मुलांना लस देण्यासाठी हे करा !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार येत्या 3 जानेवारी पासून 15 ते 18 वर्षातील मुलामुलींसाठी देण्यात येणारी लस ही ऑनलाइन आणि ऑफलाईन पध्दतीने नोंदणी केल्यानंतर उपलब्ध होणार आहे.तसेच फ्रंटलाईन वर्कर साठीचा बूस्टर डोस आणि त्याबाबतच्या सूचना केंद्राने जारी केल्या आहेत.

१५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्सना येत्या १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण त्यांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्यांनाच हा बूस्टर डोस घेता येणार आहे.

आणि ६० वर्षांवरील नागरिक जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, अशांना १० जानेवारी २०२२ पासूनच बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पण या लोकांना सरसकट बूस्टर डोस मिळणार नाही. तर त्यांच्या डॉक्टरांनी जर सुचवलं की त्यांना बूस्टर डोसची गरज आहे तरच अशा नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. पण त्यासाठी देखील या नागरिकांनी दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे.

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेले जे नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाउंटवरुनच बूस्टर डोस घेता येणार आहे.

कोविन सिस्टिममध्ये बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी दुसरा डोस कोणत्या तारखेला घेतला आहे, त्यावरुनच त्यांना बूस्टर डोस घेता येणार आहे.

बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसनंतर जेव्हा त्यांची या बूस्टर डोससाठी तारीख ड्यू असेल त्यापूर्वी कोविन सिस्टिममकडून एसएमएस पाठवण्यात येईल.

बूस्टर डोससाठी ऑनलाइन आणि थेट लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.बूस्टर डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या लस प्रमाणपत्रावर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असेल.

ज्या मुलांचं वय हे १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल तसेच ज्यांचं जन्म वर्ष २००७ किंवा त्यापूर्वीचं असेल ते सर्व लस घेण्यात पात्र असून त्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल.

कोविनवरील सध्याच्या अकाऊंटवरुन किंवा नव्यानं अकाउंट तयार करुन या लाभार्थ्यांना नोंदणी करता येईल. यासाठी त्यांना युनिक मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. सध्याच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध असेल.या लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही फॅसिलिटी रजिस्ट्रेशन मोडद्वारे नोंदणी करता येईल.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑनसाईट (वॉकइन) नोंदणी करता येणार आहे.१५ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन लसंच देण्यात येणार आहे. कारण याच लसीला सध्या परवानगी देण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click