August 9, 2022

जिल्हा रुग्णालयात ब्रदर ला मारहाण !

जिल्हा रुग्णालयात ब्रदर ला मारहाण !

बीड- जिल्हा रुग्णालयात नाईट ड्युटीवर असलेल्या प्रशांत सुकाळे या ब्रदर ला रुग्णाच्या मित्रांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला.या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ साबळे यांना निवेदन देण्यात आले आहे, गेल्या पंधरा दिवसात ब्रदर ला मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे.यामुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात सध्या कोणाचेच नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.आवो जावो घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे.रात्रीच्या वेळी ड्युटी करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ आली आहे.

शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दोघे जण जिल्हा रुग्णालयात आले,त्यातील एका व्यक्तीस इजा झाल्याने ड्युटीवर असलेले ब्रदर प्रशांत सुकाळे यांनी त्या रुग्णास सलाईन लावण्यासाठी बेडवर झोपण्यास सांगितले, मात्र सोबतच्या व्यक्तीने ऍडमिट होण्यास नकार देत संतोष थोरात याला फोन लावला.

थोरात हा काही जणांना सोबत घेऊन आला अणे त्याने सुकाळे यांना खाली ओढत आणत बेदम मारहाण केली.हा सगळा प्रकार घडला तेव्हा डॉ कट्टे यांच्यासह इतर कर्मचारी हे हजर होते.हा सगळा प्रकार घडल्यानंतर सुकाळे यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साबळे यांना निवेदन दिले आहे.

यापूर्वी देखील असाच प्रकार पंधरा दिवसांपूर्वी घडला होता.मात्र त्यात सुद्धा कोणतीच कारवाई केली गेलीनही.जिल्हा रुग्णालयात डॉक्टर असो की स्टाफ यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही यंत्रणा नाही.विशेष म्हणजे या परिसरात असलेल्या पोलीस चौकीत रात्रीच्या वेळी कोणीच नसते.त्यामुळे डॉक्टर सह कर्मचारी धास्तावले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click