बीड – जिल्हा रुग्णालयात मेडिकल किंवा नॉन मेडिकल कोणतीही खरेदी असो ती करावयाची असल्यास त्याच्या आवश्यकता तपासणी अन मंजुरी साठी एसीएस यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली आहे.मात्र गेल्या दोन तीन वर्षात या समितीची एकही बैठकन होता,शेकडो कोटी रुपयांची खरेदी केली गेली आहे.
बीड जिल्हा रुग्णालय म्हणजे बांगर,मुंडे,जायभाये यांच्यासाठी पैसे छापण्याचा कारखाना झालेले आहे.थोरात असो की गित्ते किंवा साबळे प्रत्येकाने या तिघांच्या कृष्णकृत्यावर नोटांचे पांघरून घातले आहे.त्यामुळेच कोणी काहीही तक्रार केली तरी आपलं काही वाकड होत नाही अस हे थाटात सांगतात.
बीड असो की राज्यातील कोणताही जिल्हा रुग्णालय,या ठिकाणी टाचणी पासून ते ऑक्सिजन प्लांट पर्यंत कोणतीही वस्तू असो,ती खरेदी करताना त्याची आवश्यकता,किती प्रमाणात लागेल,किती दिवसात लागेल,खरोखरच आवश्यकता आहे का या गोष्टी तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य साहित्य संपादन समिती नामक एक समिती एसीएस,वैद्यकीय अधिकारी,जिल्हा उद्योगकेंद्राचा अधिकारी, महसूल चा एक अधिकारी आणि स्टोर किपर यांचा समावेश आहे.
या समितीकडून एकदा खरेदी बाबत नोट पुटप् झाली की त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करून खरेदीची कारवाई केली जाते.मात्र गेल्या तीन वर्षात या समितीची एकही बैठक झालीच नाही.काही वेळा अशा बैठका झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेले.कारण ही सगळी खरेदी अन पुरवठा गणेश बांगर,अजिनाथ मुंडे आणि राजरतन जायभाये यांच्या मार्फत केली गेली.
ही खरेदी करताना तत्कालीन ते आतापर्यंतचे सर्व वरिष्ठ आपल्या बाजूने कसे राहतील याची काळजी घेतली गेली.खरेदी मेडिकल असो की नॉन मेडिकल,या तिघांनी नंगानाच केला.आणि यांच्यावर आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही कारण वरपासून खालपर्यंत सगळेच मॅनेज आहेत.
आता सिएस साबळे हे कारवाई करणार की हे प्रकरण सुद्धा यशस्वीपणे दाबून टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.