January 28, 2022

गुटख्याचा ट्रक लुटणारे पळाले,ड्रायव्हर पकडला !

गुटख्याचा ट्रक लुटणारे पळाले,ड्रायव्हर पकडला !

केज – परराज्यातून गुटखा आणून तो अंबाजोगाई केज मार्गे शिरूर ला घेऊन जात असताना केज अंबाजोगाई रोडवर ट्रक लुटून घेऊन जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग पोलिसांनी केला.मात्र यावेळी सात आरोपी फरार झाले तर ट्रकसह ड्रायव्हर ला पोलिसांनी अटक केली.प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पंकज कुमावत यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना गुटख्याचा ट्रक अंबाजोगाई हुन केजकडे येत असल्याची माहिती मिळाली.या पथकाने हा ट्रक नेकनूर पोलिसांच्या मदतीने थांबवला असता त्यातील क्लिनर फरार झाला तसेच त्यासोबत असलेल्या व्हेरणा (mh 04-1622) या गाडीतून सहा जण फरार झाले.

पोलिसांनी ट्रक (KA 56 -0516) तपासणी केला असता त्यात तब्बल 21 लाख रुपयांचा गोवा गुटखा आढळून आला.पोलिसांनी हा प्रकरणी अमोल कानुजे,वीरेंद्र जयभाये,सिम्पल पालवे,सचिन काते, गणेश गायकवाड आणि पिनू पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक लुटून शिरूर ला नेला जात होता मात्र पोलिसांनी तो अडवून जप्त केल्याने लुटणारे फरार झाले,अद्याप हा गुटखा कोणाचा होता हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click